Form

iPratham व विद्यार्थी मित्र, पुणे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा 2021 – 22

सध्याच्या युगात उच्च शिक्षण असो वा नोकरी स्पर्धा परीक्षांना फार महत्व प्राप्त झाले आहे. राज्य सरकारी (एम पी एस सी) व केंद्र सरकारी (यु पी एस सी) अधिकार्यापर्यंत स्पर्धा परीक्षा ही अनिर्वार्य आहे. बँकेतील सर्व जागा, स्टाफ सिलेक्शन बोर्ड, शिक्षक, रेल्वे, सैन्य इत्यादी सर्व भरतीसाठी स्पर्धा परीक्षा अनिर्वार्य आहेच. एवढेच नव्हे तर बहुतेक खाजगी कंपन्या सुद्धा चाळणीसाठी स्पर्धा परीक्षा घेतात. म्हणजेच नोकरी कोणतीही असो स्पर्धा परीक्षा ही आलीच. याच बरोबर बारावीनंतर जवजवळ सर्व शिक्षणशाखांतील प्रवेश्याकरिता स्पर्धा परीक्षा अनिर्वार्य केल्या आहेत. उदा. सी ई टी, नीट, जे ई ई, कॅट इत्यादी.

उत्तम करिअर, चांगली नोकरी, पदव्युत्तर चांगला अभ्यासक्रम इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातूनच मिळू शकतात. म्हणून आता प्राथमिक शिक्षणापासूनच मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे आवश्यक झाले आहे. कित्तेक विद्यार्थी हे बारावी व पदवी परिक्षेमध्ये खूप चांगले गुण मिळवतात परंतु महाविद्यालय प्रवेश व नोकरीसाठी या गुणांचा उपयोग नसून स्पर्धात्मक प्रवेश परिक्षेतिल गुण हेच जास्त महत्वाचे असतात.

या सर्व परीक्षांचा अभ्यास केला तर असे आढळून येईल की या सर्व परीक्षांसाठी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी या चार विषयांचा मुलभूत अभ्यास हा पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पक्का होतो. त्यामुळे शिक्षकांनी व पालकांनी मुलांना या iPratham व विद्यार्थी मित्र, पुणे आयोजित शिष्यवृत्ती परिक्षेला बसविणे हे अत्यावश्यक आहे.

या शिष्यवृत्ती व इतर सर्वच शालेय स्पर्धा परिक्षांना लहान वयातच सर्वच मुलांना बसवून त्यांना iPratham व विद्यार्थी मित्र, पुणे मार्फत योग्य मार्गदर्शन भविष्य निश्चितच चांगले असेल.

Registration

"*" indicates required fields

Full Name*
School or College Name*
DD slash MM slash YYYY
Address*